नमस्कार मित्रांनो,
इंग्रजी बोलताना शब्दांना जेवढी किंमत आहे त्यापेक्षा जास्त किंमत तुमच्या बोलण्याच्या पद्धतीला आहे. अनेकदा आपण व्याकरणाच्या दृष्टीने बरोबर बोलतो पण समोरच्याला ते वाक्य उद्धट वाटते. याचे कारण म्हणजे आपल्याला Modal Verbs चा वापर माहित नसतो.
Can Could Should Would May Might हे शब्द इंग्रजी भाषेचा आत्मा आहेत. हे शब्द वाक्याचा फक्त अर्थ बदलत नाहीत तर त्या वाक्यातील भावना बदलतात. तुम्हाला कोणाला ऑर्डर द्यायची आहे की विनंती करायची आहे हे या शब्दांवरून ठरते.
आज आपण गुगलवर सर्वात जास्त शोधल्या जाणाऱ्या या शब्दांचा अचूक वापर आणि त्यातील फरक सोप्या भाषेत समजून घेणार आहोत.
Can आणि Could मधील फरक (शक्ती विरुद्ध नम्रता)
अनेक लोकांना वाटते की Can आणि Could हे दोन्ही शब्द 'शकता का' यासाठी वापरतात. पण यात जमीन अस्मानाचा फरक आहे.
Can (कॅन) हा शब्द तुमची ताकद किंवा क्षमता (Ability) दाखवण्यासाठी वापरतात. तसेच मित्रमैत्रिणींशी अनौपचारिक (Informal) बोलताना हा शब्द वापरला जातो.
उदाहरणे: मी हे बॉक्स उचलू शकतो. I can lift this box. (ही माझी ताकद आहे)
मी तुला हरवू शकतो. I can defeat you.
Can (क्षमता किंवा ताकद) सरावासाठी उदाहरणे' (Practice Examples)
१. मी इंग्रजी बोलू शकतो. I can speak English.
२. ती खूप वेगाने धावू शकते. She can run very fast.
३. तू मला ऐकू शकतोस का? Can you hear me?
४. आम्ही हा सामना जिंकू शकतो. We can win this match.
५. मी तुला मदत करू शकत नाही. I cannot help you.
६. पक्षी आकाशात उडू शकतात. Birds can fly in the sky.
७. तू हे बॉक्स उचलू शकतोस का? Can you lift this box?
८. मी गाडी चालवू शकतो. I can drive a car.
९. धूम्रपान कॅन्सरला आमंत्रण देऊ शकते. Smoking can cause cancer.
१०. तू आता घरी जाऊ शकतोस. You can go home now.
Could (कुड) हा शब्द Can चा भूतकाळ आहेच पण त्याहीपेक्षा जास्त याचा वापर 'अतिशय नम्रपणे' विनंती करण्यासाठी केला जातो. जेव्हा तुम्ही तुमच्या बॉसशी किंवा अनोळखी व्यक्तीशी बोलता तेव्हा Can वापरणे चुकीचे वाटते तिथे Could वापरले पाहिजे.
उदाहरणे: तुम्ही मला तुमची पेन देऊ शकाल का? Could you please give me your pen? (ही नम्र विनंती आहे)
तुम्ही मला मदत करू शकाल का? Could you help me?
थोडक्यात : मित्राला विचारायचे असेल तर Can वापरा आणि शिक्षकांना किंवा वडिलांना विचारायचे असेल तर Could वापरा.
Could (नम्र विनंती किंवा भूतकाळातील क्षमता) सरावासाठी उदाहरणे' (Practice Examples)
१. तू मला पाण्याचा ग्लास देशील का? Could you give me a glass of water?
२. मी तुझे नाव विचारू शकतो का? Could I ask your name?
३. मी लहान असताना वेगाने धावू शकत होतो. I could run fast when I was young.
४. कृपया तू दरवाजा उघडशील का? Could you please open the door?
५. काल मी ऑफिसला येऊ शकलो नाही. I could not come to the office yesterday.
६. तू मला हा पत्ता सांगू शकशील का? Could you tell me this address?
७. आम्ही वेळेवर पोहोचू शकलो नाही. We could not reach on time.
८. तू मला थोडी मदत करशील का? Could you do me a favor?
९. मी तुझा फोन वापरू शकतो का? Could I use your phone?
१०. ती काल परीक्षेत पास होऊ शकली असती. She could have passed the exam yesterday.
Will आणि Would मधील गोंधळ (भविष्य विरुद्ध ऑफर)
Will हे आपण भविष्यकाळासाठी वापरतो हे सर्वांना माहित आहे. पण Would चा वापर नक्की कशासाठी होतो हे ९० टक्के लोकांना माहित नाही.
Will (विल) जेव्हा एखादी गोष्ट आपण नक्की करणार आहोत हे सांगायचे असते.
उदाहरणे: मी उद्या येईल. I will come tomorrow.
Will (भविष्यकाळ किंवा निश्चय) सरावासाठी उदाहरणे' (Practice Examples)
१. मी उद्या मुंबईला जाईन. I will go to Mumbai tomorrow.
२. आज पाऊस पडेल. It will rain today.
३. मी तुला कधीच विसरणार नाही. I will never forget you.
४. तू माझ्यासोबत येशील का? Will you come with me?
५. ती नक्की परीक्षेत पास होईल. She will surely pass the exam.
६. आम्ही तुला मदत करू. We will help you.
७. मी तुझी वाट बघेन. I will wait for you.
८. तो मला पैसे परत करेल. He will return my money.
९. भारत हा सामना जिंकेल. India will win this match.
१०. मी तुला नंतर फोन करेन. I will call you later.
Would (वुड) Would चा सर्वात महत्त्वाचा वापर म्हणजे समोरच्याला एखादी गोष्ट 'ऑफर' (Offer) करणे किंवा त्याची इच्छा विचारणे. हॉटेलमध्ये गेल्यावर किंवा घरी पाहुणे आल्यावर Will वापरणे चुकीचे आहे तिथे Would वापरले जाते.
उदाहरणे: तुम्हाला चहा घ्यायला आवडेल का? Would you like to take tea?
तुम्ही माझ्यासोबत याल का? Would you like to come with me?
तसेच भूतकाळातील सवयी सांगण्यासाठी सुद्धा Would वापरतात. मी लहानपणी क्रिकेट खेळायचो. I would play cricket in my childhood.
Would (ऑफर किंवा भूतकाळातील सवय) सरावासाठी उदाहरणे' (Practice Examples)
१. तुम्हाला चहा घ्यायला आवडेल का? Would you like to have tea?
२. तू माझ्यासोबत डान्स करशील का? Would you like to dance with me?
३. मी लहानपणी क्रिकेट खेळायचो. I would play cricket in my childhood.
४. मला तुम्हाला भेटायला आवडेल. I would like to meet you.
५. तो म्हणाला की तो येईल. He said that he would come.
६. तू कृपया शांत बसशील का? Would you please keep quiet?
७. मला एक प्रश्न विचारायला आवडेल. I would like to ask a question.
८. आम्ही सुट्टीत आजीकडे जायचो. We would go to grandmother's house in holidays.
९. तुला काय खायला आवडेल? What would you like to eat?
१०. जर मी पक्षी असतो तर आकाशात उडालो असतो. If I were a bird, I would fly in the sky.
Should आणि Must (सल्ला विरुद्ध सक्ती)
मराठीत आपण म्हणतो की तू हे केले पाहिजे. आता यासाठी Should वापरायचे की Must वापरायचे यात खूप लोक गोंधळतात.
Should (शूड) जेव्हा आपण कोणाला फक्त सल्ला (Advice) देतो पण समोरच्याने तो ऐकलाच पाहिजे अशी सक्ती नसते तेव्हा Should वापरतात.
उदाहरणे: तू सकाळी लवकर उठले पाहिजे. You should wake up early. (हा फक्त सल्ला आहे)
तू डॉक्टरांकडे गेले पाहिजे. You should go to a doctor.
Should (सल्ला किंवा कर्तव्य) सरावासाठी उदाहरणे' (Practice Examples)
१. तू वेळेवर औषध घेतले पाहिजे. You should take medicine on time.
२. आपण मोठ्यांचा आदर केला पाहिजे. We should respect elders.
३. तू खोटे बोलले नाही पाहिजे. You should not tell a lie.
४. त्याने धुम्रपान सोडले पाहिजे. He should stop smoking.
५. आपण झाडे लावली पाहिजेत. We should plant trees.
६. तू डॉक्टरांना दाखवले पाहिजे. You should consult a doctor.
७. आपण पाण्याची बचत केली पाहिजे. We should save water.
८. तू आता अभ्यास केला पाहिजे. You should study now.
९. मुलांनी मोबाईल कमी वापरला पाहिजे. Children should use mobile less.
१०. मी आता काय केले पाहिजे? What should I do now?
Must (मस्ट) जेव्हा एखादी गोष्ट करणे बंधनकारक असते किंवा सक्तीची असते तेव्हा Must वापरतात. तिथे पर्याय नसतो.
उदाहरणे: तुला हेल्मेट घातलेच पाहिजे. You must wear a helmet. (हा कायदा आहे)
तुला आता थांबलेच पाहिजे. You must stop now.
Must (सक्ती किंवा बंधनकारक) सरावासाठी उदाहरणे' (Practice Examples)
१. तुला आता थांबलेच पाहिजे. You must stop now.
२. आपण रहदारीचे नियम पाळलेच पाहिजेत. We must follow traffic rules.
३. तुला हे काम आज पूर्ण केलेच पाहिजे. You must finish this work today.
४. आपण आपले ओळखपत्र सोबत ठेवलेच पाहिजे. We must carry our ID card.
५. तुला तिथे जाण्याची परवानगी नाहीच. You must not go there.
६. आपल्याला कर भरलाच पाहिजे. We must pay the tax.
७. सैनिकांनी गणवेश घातलाच पाहिजे. Soldiers must wear uniform.
८. तुला सत्य सांगितलेच पाहिजे. You must tell the truth.
९. हे गुपित तुला कोणालाच सांगायचे नाहीये. You must not tell this secret to anyone.
१०. परीक्षेसाठी तुला हॉल तिकीट आणलेच पाहिजे. You must bring the hall ticket for the exam.
May आणि Might (शक्यता)
जेव्हा एखादी गोष्ट घडण्याची शक्यता असते तेव्हा हे शब्द वापरतात.
May (मे) जेव्हा शक्यता जास्त असते (५० टक्क्यांपेक्षा जास्त). आज पाऊस पडू शकतो. It may rain today. (ढग आले आहेत)
May (शक्यता - जास्त) सरावासाठी उदाहरणे' (Practice Examples)
१. आज पाऊस पडू शकतो. It may rain today.
२. मी आत येऊ शकतो का? May I come in?
३. देव तुझे भले करो. May God bless you.
४. सर आज उशीरा येऊ शकतात. Sir may come late today.
५. मी तुम्हाला एक प्रश्न विचारू शकतो का? May I ask you a question?
६. ही बातमी खरी असू शकते. This news may be true.
७. तो आजारी असू शकतो. He may be sick.
८. मी आता जाऊ शकतो का? May I go now?
९. तुम्हाला दीर्घायुष्य लाभो. May you live long.
१०. ते आम्हाला मदत करतील अशी शक्यता आहे. They may help us.
Might (माईट) जेव्हा शक्यता खूप कमी असते (२० टक्क्यांपेक्षा कमी). तो कदाचित येईल. He might come. (येण्याची शक्यता खूप कमी आहे)
Might (शक्यता - कमी) सरावासाठी उदाहरणे' (Practice Examples)
१. तो कदाचित आज येईल. He might come today.
२. त्यांना कदाचित हे माहित नसेल. They might not know this.
३. ती कदाचित घरी असेल. She might be at home.
४. कदाचित आज पाऊस पडेल. (ढग नाहीत) It might rain today.
५. त्याने कदाचित हे काम केले असेल. He might have done this work.
६. जर तू वेगाने धावलास तर कदाचित बस पकडशील. If you run fast, you might catch the bus.
७. ते कदाचित उपाशी असतील. They might be hungry.
८. कदाचित हे खरे असेल. It might be true.
९. मी कदाचित उद्या सुट्टी घेईन. I might take leave tomorrow.
१०. त्याला कदाचित तुझा पत्ता माहित असेल. He might know your address.
मित्रांनो इंग्रजी ही भावनांची भाषा आहे. तुम्ही कोणते शब्द वापरता यावरून समोरचा माणूस तुम्हाला जज करत असतो. जर तुम्हाला नम्र दिसायचे असेल तर Could आणि Would चा जास्तीत जास्त वापर करा. जर तुम्हाला ताकद दाखवायची असेल तर Can वापरा. आणि जर तुम्हाला हक्काने सांगायचे असेल तर Must वापरा.
हे नियम पाठ करू नका तर रोजच्या बोलण्यात वापरा. तुम्हाला यातील कोणता फरक सर्वात जास्त महत्त्वाचा वाटला हे आम्हाला कमेंट करून सांगा.


Post a Comment