नमस्कार मित्रांनो,
आपण जेव्हा बाजारात कपडे घ्यायला जातो, तेव्हा दोन प्रकार असतात. एक म्हणजे कापड घेऊन शिंप्याकडून शिवून घेणे आणि दुसरे म्हणजे रेडीमेड कपडे घेणे. रेडीमेड कपडे घेण्याचा फायदा हा असतो की ते लगेच वापरता येतात. इंग्रजी बोलण्याचे सुद्धा तसेच आहे.
प्रत्येक वेळी कर्ता, कर्म आणि क्रियापद जुळवत बसण्यापेक्षा जर तुम्ही रोजच्या वापरातील काही ठराविक वाक्ये पाठ केलीत, तर तुम्हाला व्याकरणाचा विचार करावा लागणार नाही. जसे आपण मराठीत लहानपणापासून वाक्ये ऐकून शिकलो, तसेच इंग्रजी सुद्धा या रेडीमेड वाक्यांनी शिकता येते.
आज आपण सकाळपासून रात्रीपर्यंत लागणारी ५० महत्त्वाची वाक्ये बघणार आहोत. ही वाक्ये पाठ करा आणि संधी मिळेल तिथे वापरा.
घरात आणि स्वयंपाकघरात वापरली जाणारी वाक्ये
सकाळी उठल्यापासून घरात अनेक लहानसहान गोष्टींसाठी आपण मराठी बोलतो. तिथे आता हे इंग्रजी शब्द वापरा.
१. कृपया पंखा चालू कर. Please turn on the fan.
२. पंखा बंद कर. Turn off the fan.
३. तुझा आवाज खाली ठेव. Lower your voice.
४. टॉवेल बाहेर वाळत घाल. Put the towel outside to dry.
५. आज भाजी काय बनवली आहे? Which vegetable is cooked today?
६. मला तहान लागली आहे. I am thirsty.
७. जेवण वाढून घे. Serve the food.
८. टीव्हीचा आवाज वाढव. Increase the volume.
९. अंथरुण घाल. Make the bed.
१०. तयार हो, आपल्याला उशीर होतोय. Get ready, we are getting late.
कोणावर तरी रागवताना किंवा वाद घालताना
अनेकदा रागाच्या भरात आपल्याला इंग्रजी शब्द सुचत नाहीत. अशा वेळी ही वाक्ये तुमची बाजू मांडायला मदत करतील.
११. तुझी जीभ आवर. Mind your language.
१२. माझ्या नादी लागू नकोस. Don't mess with me.
१३. तू हे मुद्दाम केलेस. You did this on purpose.
१४. मला बोट दाखवू नकोस. Don't point your finger at me.
१५. तुला काय वाटते मी मूर्ख आहे? Do you think I am stupid?
१६. माझ्याशी नीट बोल. Talk to me properly.
१७. हा सगळा तुझा दोष आहे. It is all your fault.
१८. मला तुझा चेहरा बघायचा नाही. I don't want to see your face.
१९. गप्प बस, एक शब्दही बोलू नकोस. Shut up, don't say a word.
२०. विषय इथेच संपव. End the matter here.
फोनवर बोलताना लागणारी वाक्ये
फोनवर इंग्रजी बोलताना समोरच्याला आपला चेहरा दिसत नाही, त्यामुळे आपला आवाज आणि वाक्ये स्पष्ट असावी लागतात.
२१. तुझा आवाज तुटतोय. Your voice is breaking.
२२. मला थोड्या वेळाने फोन कर. Call me back later.
२३. मी तुला होल्डवर ठेवू शकतो का? Can I put you on hold?
२४. तुझा फोन लागत नव्हता. Your phone was not reachable.
२५. बॅटरी संपत आली आहे. My battery is about to die.
२६. तू मला ऐकू शकतोस का? Can you hear me?
२७. त्याने फोन कट केला. He hung up the phone.
२८. मी तुला मेसेज पाठवला आहे. I have sent you a message.
२९. माझा फोन उचल. Pick up my phone.
३०. मी आता बोलू शकत नाही. I cannot talk right now.
बाहेर भेटल्यावर किंवा ऑफिसमध्ये
३१. खूप दिवसांनी भेटलो आपण. Long time no see.
३२. आजकाल काय चाललंय? What is going on these days?
३३. तुझे काम कसे चालले आहे? How is your work going?
३४. तुला काही मदत हवी आहे का? Do you need any help?
३५. माझ्याकडे सुट्टे पैसे नाहीत. I don't have change.
३६. आपण बसने जाऊया का? Shall we go by bus?
३७. रहदारी खूप आहे. There is too much traffic.
३८. मला ऑफिसला जायचे आहे. I have to go to the office.
३९. तू कशाचा विचार करत आहेस? What are you thinking about?
४०. काळजी करण्याचे काही कारण नाही. There is nothing to worry about.
इतर महत्त्वाची वाक्ये (मिश्र)
४१. जे झाले ते झाले. Let bygones be bygones.
४२. माझ्यावर एक उपकार कर. Do me a favor.
४३. मला समजले नाही. I did not understand.
४४. पुन्हा एकदा सांगशील का? Can you repeat that?
४५. उशीर झाल्याबद्दल क्षमस्व. Sorry for being late.
४६. हे तुझ्यासाठी आहे. This is for you.
४७. तो खूप हुशार आहे. He is very smart.
४८. पाऊस पडण्याची शक्यता आहे. It is likely to rain.
४९. मला खोटे बोलणे आवडत नाही. I don't like lying.
५०. देवाची कृपा. God's grace.
मित्रांनो, इंग्रजी बोलणे म्हणजे मोठे शब्द वापरणे नाही. वरील ५० वाक्ये जर तुम्ही रोजच्या जीवनात वापरली, तर तुमचे ५० टक्के काम तिथेच झाले. ही वाक्ये पाठ करा आणि आरशासमोर उभे राहून ती मोठ्याने बोलण्याचा सराव करा.
तुम्हाला यातील कोणते वाक्य सर्वात जास्त उपयोगी वाटले? कमेंट करून नक्की सांगा.

Post a Comment