प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 4 थी) (Scholarship)अभ्यासक्रम

प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 4 थी) च्या प्रथम भाषा (मराठी माध्यम),गणित, इंग्रजी , बुद्धिमत्ता चाचणी या विषयाचा अभ्यासक्रम महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे द्वारे निर्धारित केलेला आहे.

 हे माहितीपत्रक महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्याद्वारे निर्धारित केलेल्या इयत्ता चौथ्या (4 थी) च्या प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेच्या गणित विषयाच्या अभ्यासक्रमावर आधारित आहेपरीक्षेचे माध्यम मराठी आहे.

प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 4 थी)


 


गणिताचा अभ्यास करताना कोणत्या घटकावर किती लक्ष द्यावे, यासाठी खालीलप्रमाणे भारांश (Weightage) निश्चित केलेला आहे. संख्यांवरील क्रिया आणि मापन/महत्त्वमापन या घटकांवर सर्वाधिक भर आहे

अ. क्र.घटकभारांश (टक्के)
1संख्याज्ञान (Number Sense)16%
2संख्यांवरील क्रिया (Operations on Numbers)20%
3अपूर्णांक (Fractions)12%
4मापन / महत्त्वमापन (Measurement)20%
5आकृतिबंध (Patterns)8%
6भूमिती (Geometry)18%
7चित्रालेख (Pictograph)6%


घटक आणि मुख्य उपघटक (Components and Key Sub-topics)

प्रत्येक घटकात कोणते महत्त्वाचे भाग समाविष्ट आहेत, ते खालीलप्रमाणे स्पष्ट केले आहे.

1) संख्याज्ञान : या घटकात आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हे वाचन व लेखन , पाच अंकापर्यंतच्या संख्यांचे वाचन व लेखन , अंकांची दर्शनी किंमत, स्थानिक किंमत, विस्तारित मांडणी , मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या , संख्याचा चढता क्रम व उतरता क्रम, तुलना , 1 ते 100 संख्यावर आधारित प्रश्न , सम, विषम संख्या , आणि 1 ते 100 मधील मूळ, संयुक्त, त्रिकोणी व चौरस संख्या यांचा अभ्यास करायचा आहे.

2) संख्यांवरील क्रिया: या घटकात बेरीज (पाच अंकी संख्यापर्यंत, हातच्याची बेरीज, शाब्दिक उदाहरणे) , वजाबाकी (पाच अंकी संख्यापर्यंत, हातच्याची वजाबाकी, शाब्दिक उदाहरणे) , गुणाकार (तीन अंकी गुणिले दोन अंकी संख्यापर्यंत, शाब्दिक उदाहरणे) , आणि भागाकार (तीन अंकी भागिले दोन अंकी संख्यापर्यंत, शाब्दिक उदाहरणे) यांचा समावेश आहे.

3) अपूर्णांक: या घटकात अपूर्णांकाचे अर्थ, वाचन व लेखन , व्यवहारी अपूर्णांक (समच्छेद अपूर्णांक, भिन्नच्छेद अपूर्णांक, अपूर्णांकाचा लहानमोठेपणा, चढता उतरता क्रम) , आणि अंशाधिक, छेदाधिक व पूर्णांकयुक्त अपूर्णांक (तुलना व परस्पर रुपांतर) यांचा समावेश आहे.

4) मापन / महत्त्वमापन: या घटकात लांबी, वस्तुमान, धारकता एककाचे परस्पर रूपांतर, बेरीज, वजाबाकी व शाब्दिक उदाहरणे , कालमापन (घड्याळ - मध्यान्हपूर्व, माध्यान्होत्तर), तास, मिनिटे परस्पर रुपांतर , दिनदर्शिका , कागदमापन , आणि नाणी - नोटा (रुपये-पैसे, परस्पर रुपांतर, मूलभूत क्रियांवर आधारित शाब्दिक उदाहरणे) यांचा समावेश आहे.

5) आकृतिबंध: या घटकात संख्यांचे आकृतिबंध आणि विविध मुक्तहस्त आकृत्या यांचा अभ्यास करायचा आहे.

6) भूमिती: या घटकात कोन व त्यांचे प्रकार (काटकोन, लघुकोन, विशालकोन) , सममिती , शिरोबिंदू, बाजू (त्रिकोण, चौरस, आयत) , वर्तुळ (त्रिज्या, जीवा, व्यास, केंद्र, कड (परीघ), अंतर्भाग, बाह्यभाग) , परिमिती (त्रिकोण, आयत, चौरस) , क्षेत्रफळ (आयत, चौरस) , त्रिमिती वस्तू व घडणी , दंडगोल, शंकू व गोल (कडा व कोपरे) , आणि इष्टिकाचिती व घन (कडा, शिरोबिंदू, पृष्ठे) यांचा समावेश आहे

7) चित्रालेख: या घटकात चित्ररुप माहितीचे आकलन अपेक्षित आहे.


प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 4 थी) च्या बुध्दिमत्ता चाचणी अभ्यासक्रम (मराठी माध्यम) 

 घटक आणि उपघटकांचा तपशील:

  1. आकलन (Comprehension) - भारांश 08%: या घटकाचे उपघटक आहेत: सूचनापालन (जोडाक्षरे, शब्द, अक्षर) , संख्यामालिका , आणि इंग्रजी अक्षरमाला.

  2. वर्गीकरण (Classification) - भारांश 10%: या घटकाचे उपघटक आहेत: शब्दसंग्रह , आकृत्या , संख्या , आणि इंग्रजी अक्षरमाला.

  3. समसंबंध (Analogy) - भारांश 10%: या घटकाचे उपघटक आहेत: शब्दसंग्रह , आकृत्या , संख्या , आणि इंग्रजी अक्षरमाला.

  4. क्रम ओळखणे (Identifying Sequence) - भारांश 10%: या घटकाचे उपघटक आहेत: संख्या , आकृत्यांची मालिका , चिन्हांची मालिका , आणि चुकीचे पद ओळखणे (संख्या).

  5. गटाशी जुळणारे पद (Matching the Group) - भारांश 08%: या घटकाचे उपघटक आहेत: शब्दसंग्रह , आकृत्या , संख्या , आणि इंग्रजी अक्षरमाला.

  6. जलप्रतिबिंब (Water Image) - भारांश 04%: या घटकाचे उपघटक आहेत: आकृत्या , अंक , आणि अक्षरे.

  7. आरशातील प्रतिमा (Mirror Image) - भारांश 04%: या घटकाचे उपघटक आहेत: आकृत्या , अंक , आणि अक्षरे.

  8. समान पद ओळखणे (Identifying the Similar Term) - भारांश 04%: या घटकाचा उपघटक आहे: आकृत्या.

  9. तर्कसंगती व अनुमान (Logic and Inference) - भारांश 14%: या घटकाचे उपघटक आहेत: भाषिक (वय, तुलना, नावात बदल, नाती) , आणि अभाषिक (आकृत्या मोजणे - त्रिकोण, चौकोन, चौरस, आयत, रेषाखंड, कोन, घनाकृती ठोकळे इत्यादी).

  10. कूटप्रश्न (Puzzles) - भारांश 18%: हा सर्वाधिक भारांशाचा घटक आहे. याचे उपघटक आहेत: रांगेतील स्थान , दिशा , दिनदर्शिका , वेन आकृती , आणि चौरस, वर्तुळ, त्रिकोण इत्यादी आकृत्यांमधील संख्या.

  11. सांकेतिक भाषा (Coded Language) - भारांश 08%: या घटकात शब्द, संख्या, चिन्हे यांचा परस्पर वापर अपेक्षित आहे.

  12. विशेष प्रश्न (Special Questions) - भारांश 02%: या घटकात भावनिक व सामाजिक बुध्दिमत्ता यावर आधारित प्रश्न असतील.


प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 4 थी) च्या प्रथम भाषा (मराठी माध्यम)  अभ्यासक्रम

घटक आणि उपघटकांचा तपशील 
1) आकलन (Comprehension) - भारांश 24%: या घटकाचे उपघटक आहेत
  • उतारा व त्यावर आधारित प्रश्न
  • कविता व त्यावर आधारित प्रश्न
  • संवादावर आधारित प्रश्न
  • सुसंगत वाक्यांचा परिच्छेद
  • जाहिरातीवर आधारित प्रश्न
2) शब्दसंपत्तीवरील प्रभुत्व (Mastery over Vocabulary) - भारांश 40%: हा सर्वाधिक भारांशाचा घटक आहे. उपघटक आहेत.
  • समानार्थी शब्द
  • विरुध्दार्थी शब्द 
  • समूहदर्शक शब्द
  • शब्दसमूहाबद्दल एक शब्द
  • आलंकारिक शब्द
  • जोडशब्द
  • शब्दकोडी
  • एकाच शब्दाचे भिन्न अर्थ शोधणे
  • अक्षर जुळवून अर्थपूर्ण शब्द तयार करणे 
  • पिलू दर्शक शब्द, घर दर्शक शब्द, ध्वनी दर्शक शब्द
  • म्हणी
  • वाक्प्रचार
Scholarship



3) कार्यात्मक व्याकरण (Functional Grammar) - भारांश 32%: या घटकाचे उपघटक आहेत
  • वर्णमाला
  • शब्दकोशाप्रमाणे शब्दांचा क्रम लावणे
  • शब्दांच्या जाती (नाम , सर्वनाम , विशेषण , क्रियापद )
  • लिंग
  • वचन
  • काळ
  • विरामचिन्हे
  • वाक्यांचे भाग
  • शुद्ध अशुद्ध शब्द
  • प्रत्यय घटित व उपसर्ग घटित शब्द
4) भाषाविषयक सामान्यज्ञान (General Knowledge related to Language) - भारांश 04%: या घटकात पुढील माहितीचा अभ्यास करायचा आहे.
  • लेखक, कवी - ग्रंथ व टोपणनावे
  • खेळ - खेळाडू
  • दिनविशेष
  • विविध पुरस्कार
  • पदवी / किताब


प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 4 थी) साठीच्या तृतीय भाषा (इंग्रजी) या विषयाचा अभ्यासक्रम 

1) Letters of Alphabets (अक्षरे) - भारांश 04%:

  • एखाद्या अक्षराच्या नावाचा त्याच्या उच्चाराशी संबंध जोडणे.

  • दिलेल्या वर्णमाला (alphabets) वापरून शब्द तयार करणे.
2) Vocabulary (शब्दसंग्रह) - भारांश 28%
  • चित्रांशी शब्दांचा संबंध जोडणे (क्रियापदे, वर्णन करणारे शब्द).
  • यमके जुळणारे शब्द (Rhyming words).
  • विरुद्धार्थी शब्द (Opposite words).
  • वर्ड रजिस्टर (Word register).
  • दिलेल्या मोठ्या शब्दातून लहान शब्द शोधणे.
  • संक्षिप्त रूपे (Contracted Forms).
  • शब्दकोश कौशल्ये (Dictionary Skills).
  • मानवी शरीर, वनस्पती, प्राणी यांचे भाग.
  • पक्षी आणि प्राणी, त्यांची निवासस्थाने व आवाज यांची नावे.
  • तुलना (Comparisons - as.... as....). 
  • रंग, वस्तू, आकार, भाज्या, फळे, खेळ यांची नावे.
3) Punctuation Marks (विरामचिन्हे) - भारांश 12% 
  • Capitalization.
  • Comma (स्वल्पविराम).
  • Full stop (पूर्णविराम).
  • Question Mark (प्रश्नचिन्ह)
  • Apostrophe (अपोस्ट्रॉफी)
  • Exclamation mark (उद्गारवाचक चिन्ह)
4) Numerical Information (संख्यात्मक माहिती) - भारांश 12% 
  • आठवड्याचे दिवस.
  • वर्षाचे महिने
  • कार्डिनल आणि ऑर्डिनल संख्या (Cardinal, Ordinal numbers)
  • दिशा आणि उपदिशा दर्शविणे, नकाशा वाचन (Map reading)
5) Creative Thinking (सर्जनशील विचार) - भारांश 12%
  • दिलेल्या सूचना किंवा चित्रांवरून परिचित/संबंधित शब्द लिहिणे
  • घोषवाक्ये, संदेश (Mottos, Messages)
  • दिलेल्या सूचनांवरून कोडी सोडवणे (Solving puzzles)
  • दिलेल्या सूचनांवरून शब्दकोडी (riddles) सोडवणे
6) Grammar (व्याकरण) - भारांश 16%
  • Nouns (नाम)
  • Pronouns (सर्वनाम)
  • Adverbs (क्रियाविशेषण)
  • Prepositions (शब्दयोगी अव्यय)
  • Articles (उपपदे)
  • काळ (Tenses) - साधा वर्तमानकाळ, साधा भूतकाळ, साधा भविष्यकाळ (Simple Present, Simple Past, Simple Future).
  • एकवचन आणि अनेकवचन (Singular and Plural)
7) Comprehension (आकलन) - भारांश 08%
  • गद्य (Prose) - (20 शब्दांपर्यंतचे गद्य)
 
माहिती आवडली असल्यास Comment नक्की करा !


Post a Comment

0 Comments