नमस्कार पालक आणि शिक्षक मित्रांनो !
आपल्या आजूबाजूला अशी अनेक मुले असतात जी शाळेच्या परीक्षेत गणितात १०० पैकी १०० मार्क मिळवतात त्यांचा गुणाकार भागाकार खूप चांगला असतो पण जेव्हा हीच मुले आईबाबांसोबत भाजी मंडईत किंवा किराणा दुकानात जातात तेव्हा साध्या हिशोबात गोंधळून जातात.
दुकानदाराला ५०० ची नोट दिली आणि १२५ रुपयांचे सामान घेतले तर परत किती रुपये घ्यायचे हे त्यांना पटकन समजत नाही यालाच आपण व्यवहारिक गणितात कच्चे असणे म्हणतो.
आज आपण अशाच काही चुका पाहणार आहोत ज्या मुले पुस्तकी अभ्यासाच्या नादात रोजच्या जीवनात करतात.
पैशांची देवाणघेवाण आणि सुट्टे पैसे
शाळेत मुले वहीवर बेरीज वजाबाकी करतात तिथे हातचा घेणे किंवा देणे सोपे असते पण प्रत्यक्ष व्यवहारात जेव्हा नोटांची देवाणघेवाण होते तेव्हा मुले गोंधळतात.
$ads={1}
उदाहरणार्थ जर मुलाने दुकानदाराला २०० रुपये दिले आणि ३६ रुपयांची वस्तू घेतली तर दुकानदार आधी ४ रुपये देऊन ४० पूर्ण करतो मग वर ६० रुपये देऊन १०० पूर्ण करतो आणि शेवटी १०० ची नोट देऊन २०० पूर्ण करतो.
ही दुकानदाराची पद्धत मुलांना समजत नाही कारण त्यांनी शाळेत वेगळ्या पद्धतीने वजाबाकी शिकलेली असते यामुळे अनेकदा मुले कमी पैसे परत घेऊन येतात.
किलो आणि लिटर मधला गोंधळ
मुलांना शाळेत शिकवले जाते की १ किलो म्हणजे १००० ग्रॅम आणि १ लिटर म्हणजे १००० मिलीलिटर
पण जेव्हा आई सांगते की जाऊन अर्धा लिटर दूध आणि पाव किलो साखर घेऊन ये तेव्हा मुले गोंधळतात त्यांना कळत नाही की दुधाच्या पिशवीवर ५०० मिली लिहिले आहे तेच अर्धा लिटर आहे आणि साखरेच्या पुड्यावर २५० ग्रॅम लिहिले आहे तोच पाव किलो आहे.
वजनाच्या काट्यावरचे माप त्यांना वाचता येत नाही.
वेळेचे गणित आणि कॅलेंडर
दुपारचे १२ वाजले की त्यानंतर १ वाजतो पण त्याला १३ वाजले असेही म्हणतात हे मुलांना लवकर समजत नाही.
तसेच रेल्वेचे किंवा एसटीचे वेळापत्रक वाचताना २४ तासांचे घड्याळ वापरले जाते तिथे मुले खूप चुका करतात जर गाडी १८ वाजून ३० मिनिटांनी आहे तर नक्की संध्याकाळी किती वाजता जायचे हे त्यांना कळत नाही.
काय उपाय करावा
यावर उपाय एकच आहे की मुलांना फक्त वहीपेनात अडकवून ठेवू नका.
$ads={2}
त्यांना सोबत बाजारात न्या त्यांनाच पैसे देऊन व्यवहार करायला सांगा घरी आल्यावर त्यांना हिशोब विचारा की किती पैसे दिले होते आणि किती परत आले दूधवाल्याचा किंवा पेपरवाल्याचा महिन्याचा हिशोब त्यांना करायला सांगा.
जेव्हा गणित पुस्तकातून बाहेर पडून खऱ्या आयुष्यात येते तेव्हाच ते मुलांना खऱ्या अर्थाने समजते.
तुम्ही तुमच्या मुलांना व्यवहारात हुशार करण्यासाठी काय करता हे आम्हाला नक्की सांगा.
.webp)
.webp)
Post a Comment