नमस्कार मित्रानो !

आज आपण त्रिकोण म्हणजे काय ?त्रिकोण आणि त्याचे प्रकार कोणते असतात ते शिकणार आहोत.

व्याख्या : तीन बाजूंनी बंदिस्त असलेल्या आकृतीला त्रिकोण असे म्हणतात.

त्रिकोणाचे प्रकार | Trikonache Prakar (Types of Triangles)

त्रिकोणांचे वर्गीकरण प्रामुख्याने दोन निकषांवर केले जाते. बाजूंच्या लांबीवरून आणि कोनांच्या मापानुसार.

त्रिकोणाचे प्रकार | Types of Basic Triangles in Marathi


बाजूनुसार त्रिकोणाचे प्रकार - बाजूंच्या लांबीनुसार त्रिकोणाचे ३ प्रकार पडतात.

१. समभुज त्रिकोण २. समद्विभुज त्रिकोण ३. विषमभुज त्रिकोण

त्रिकोणाचे नाव

  1. समभुज त्रिकोण (Equilateral Triangle)

व्याख्या : ज्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंची लांबी समान असते, त्या त्रिकोणाला समभुज त्रिकोण म्हणतात. गुणधर्म. तिन्ही बाजू एकरूप समान लांबीच्या असतात. तिन्ही कोन एकरूप असतात व प्रत्येकाचे माप 60 असते. हा त्रिकोण नेहमी लघुकोन त्रिकोण असतो.


2. समद्विभुज त्रिकोण (Isosceles Triangle)

व्याख्या. ज्या त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजूंची लांबी समान असते, त्या त्रिकोणाला समद्विभुज त्रिकोण म्हणतात.

गुणधर्म. दोन बाजू एकरूप असतात. एकरूप बाजूंसमोरील कोनदेखील एकरूप समान मापाचे असतात.


3. विषमभुज त्रिकोण (Scalene Triangle)

व्याख्या. ज्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंची लांबी वेगवेगळी असमान असते, त्या त्रिकोणाला विषमभुज त्रिकोण म्हणतात.

गुणधर्म. तिन्ही बाजूंची लांबी भिन्न असते. तिन्ही कोनांची मापेदेखील भिन्न असतात.


आकृती

समभुज त्रिकोण,त्रिकोणाचे प्रकार | Types of Triangles in Marathi

समद्विभुज त्रिकोण, बाजूनुसार त्रिकोणाचे प्रकार

विषमभुज त्रिकोण,



कोनांच्या मापानुसार त्रिकोणाचे प्रकार

त्रिकोणातील कोनांच्या मापांवरून त्याचे तीन प्रकार केले जातात.

१. लघुकोन त्रिकोण २. काटकोन त्रिकोण ३. विशालकोन त्रिकोण

त्रिकोणाचे नाव

लघुकोन त्रिकोण (Acute-angled Triangle)

व्याख्या : ज्या त्रिकोणाचे तिन्ही कोन 90 पेक्षा कमी मापाचे लघुकोन असतात, त्या त्रिकोणाला लघुकोन त्रिकोण म्हणतात.

गुणधर्म : प्रत्येक कोनाचे माप 90 पेक्षा कमी असते. समभुज त्रिकोण हा नेहमीच लघुकोन त्रिकोण असतो.

उदाहरण : एका त्रिकोणाच्या कोनांची मापे 60, 70 आणि 50 असतील, तर तो लघुकोन त्रिकोण आहे.


काटकोन त्रिकोण (Right-angled Triangle)

व्याख्या : ज्या त्रिकोणाचा एक कोन 90 मापाचा काटकोन असतो, त्या त्रिकोणाला काटकोन त्रिकोण म्हणतात.

गुणधर्म : एक कोन काटकोन असतो. उरलेले दोन कोन नेहमी लघुकोन असतात आणि त्यांच्या मापांची बेरीज 90 असते. काटकोनासमोरील बाजूला कर्ण म्हणतात आणि ती त्रिकोणातील सर्वात लांब बाजू असते. या त्रिकोणामध्ये पायथागोरसचा सिद्धांत लागू होतो.

उदाहरण : त्रिकोण ACB मध्ये कोन C चे माप 90 असेल, तर तो काटकोन त्रिकोण आहे.


विशालकोन त्रिकोण (Obtuse-angled Triangle)

व्याख्या. ज्या त्रिकोणाचा एक कोन 90 पेक्षा जास्त मापाचा विशालकोन असतो, त्या त्रिकोणाला विशालकोन त्रिकोण म्हणतात.

गुणधर्म : एक कोन विशालकोन असतो. उरलेले दोन कोन नेहमी लघुकोन असतात.

उदाहरण : त्रिकोण ABC मध्ये कोन B चे माप 110 असेल, तर तो विशालकोन त्रिकोण आहे.

आकृती

लघुकोन त्रिकोण

काटकोन त्रिकोण

विशालकोन त्रिकोण

अधिक माहितीसाठी आमच्या youtube channel ला भेट दया!


भौमितिक आकृत्या म्हणजे गणितातील सोपे आणि मूलभूत आकार

हे आकार बिंदू आणि रेषा वापरून तयार होतात

यांचे मुख्य दोन प्रकार आहेत द्विमितीय आणि त्रिमितीय

द्विमितीय आकृत्या सपाट असतात त्यांना फक्त लांबी व रुंदी असते

उदाहरणार्थ त्रिकोण चौरस आयत आणि वर्तुळ

त्रिकोणाला तीन बाजू असतात चौरसाच्या चारही बाजू समान लांबीच्या असतात

आयताच्या समोरासमोरील बाजू सारख्या असतात आणि वर्तुळ पूर्ण गोल असते

त्रिमितीय आकृत्यांना लांबी रुंदी आणि उंची असते म्हणून त्या भरीव दिसतात

उदाहरणार्थ घन गोल शंकू आणि दंडगोल

आपल्या सभोवतालच्या अनेक वस्तू जसे की घर गाडी चेंडू आणि डबा या भौमितिक आकृत्यांपासून बनलेल्या असतात