विद्यार्थी समूह(STUDENTS CLUB) स्थापन करणेबाबत

राज्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये इ. १ ली ते १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी शाळा / वर्ग स्तरावर 'विद्यार्थी समूह' (STUDENTS CLUB) स्थापन करणेबाबत GR

New 'विद्यार्थी समूह' (STUDENTS CLUB) स्थापन करणेबाबत


राज्यातील सर्व प्राथमिक/माध्य. शाळांमध्ये इ. १ ली ते १२ वी च्या विद्यार्थ्यांना अध्ययनास व सर्वंकष विकासात पूरक ठरतील असे विद्यार्थ्यांच्या कृतिशीलतेला, अंगभूत कौशल्याला, कल्पकतेला, सृजनशीलतेला, उर्जेला, चिकित्सक वृत्तीला आणि अनुकरणशीलतेला वाव देण्यासाठी विविध समूह स्थापन करून त्याचे सुयोग्य कार्यान्वयन करणे आवश्यक आहे.

राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२०, राज्य अभ्यासक्रम आराखडा- शालेय शिक्षण २०२४, PGI INDICATORS, SQAAF मधिल निदर्शकांचा यात समावेश आहे. या संदर्भाने काही विद्यार्थी समूहांची माहिती सोबतच्या यादीत दिलेली आहे.

राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० - Read More on ww.marathinest.com

GR Download करण्यासाठी वरील DOWNLOAD बटनावर क्लिक करा.

विद्यार्थ्यांसाठी शाळा / वर्ग स्तरावर 'विद्यार्थी समूह' (STUDENTS CLUB) त्याची नावे

अ.क्रविद्यार्थी समूहाचे नावअ.क्रविद्यार्थी समूहाचे नाव
मराठी विषय समूह१८आधुनिक तंत्रज्ञान समूह
इंग्रजी विषय समूह१९शालेय कार्यक्रम व्यवस्थापन समिती समूह
हिंदी विषय समूह२०सामाजिक कार्य व सर्वेक्षण समूह
उर्दू विषय समूह२१वाचन समृद्धी समूह
इतिहास विषय समूह२२समाज माध्यम व प्रसिद्धी समूह
भूगोल विषय समूह२३खगोलशास्त्र समूह
नागरिकशास्त्र विषय समूह२४माजी विद्यार्थी समूह
अर्थशास्त्र विषय समूह२५प्रगतशील विद्यार्थी समूह
गणित विषय समूह२६पाककला व परसबाग समूह
१०विज्ञान विषय समूह२७व्यावसायिक शिक्षण समूह
११क्रीडा समूह२८तक्रार निवारण समूह
१२छंदनिहाय व सहशालेय उपक्रम समूह२९मानसिक क्षमता व आव्हानात्मक प्रश्नपेढी समूह
१३विद्यार्थी संघटना समूह३०परकीय भाषा समूह
१४चालू घडामोडी समूह३१समता सहकार्य समूह
१५सामान्य ज्ञान समूह३२आर्थिक साक्षरता समूह
१६स्वच्छता, आरोग्य व परिसर सुरक्षा समूह३३आपत्कालीन व्यवस्थापन समूह
१७पर्यावरण संवर्धन समूह३४स्पर्धा परीक्षा प्रोत्साहन समूह

उपरोक्त नमूद समूहांची शाळा / वर्ग स्तरावर स्थापना, कामकाज प्रक्रिया इ. बाबत मुद्देनिहाय सविस्तर माहिती सर्व शाळांसाठी 'विद्यार्थी समूह- मार्गदर्शिका (शाळा/वर्ग स्तर)' ह्या पुस्तिकेत देण्यात आलेली आहे. सदर पुस्तिका अवलोकन करून त्यासोबत देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे आपले कार्यक्षेत्रात कार्यवाही करावी. सदर पुस्तिका ही राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे ह्या संस्थेच्या www.maa.ac.in ह्या संकेतस्थळावर

https://www.maa.ac.in/documents/Vidyarthi Samuh.pdf या लिंकवर उपलब्ध करण्यात आलेली आहे.

राज्यातील प्रत्येक प्राथमिक व माध्यमिक शाळेत इ. १ ली ते १२ वी च्या वर्गासाठी दि. १५ सप्टेंबर २०२५ पर्यंत विद्यार्थी समूहांची (STUDENTS CLUB) स्थापना करून कार्यान्वयन करणे आवश्यक राहील. राज्य मंडळाच्या अधीनस्थ सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये (प्राथमिक, माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये) विद्यार्थी संख्येप्रमाणे शक्य तेवढे विद्यार्थी समूह विद्यार्थ्यांच्या आवडी व कल लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना ताण येऊ न देता दि. १५ सप्टेंबर २०२५ पर्यंत स्थापन करण्यात यावेत.

सोबतच्या मार्गदर्शिकेत नमूद बाबींव्यतिरिक्तही प्रत्येक समूहाशी संबंधित इतर बाबींचा समावेशही समूहाच्या कामकाजामध्ये करता येईल. प्रत्येक विद्यार्थी किमान एका तरी समूहात समाविष्ट असेल याची खात्री करावी. तसेच उपरोक्त विषयांव्यतिरिक्त नवीन विद्यार्थी समूह स्थापन करायचा असेल तर प्रथम तो उपरोक्त ३४ समूहांमध्ये समाविष्ट होऊ शकणार नाही याची शाळास्तरावरच खात्री करावी आणि नंतरच नवीन विद्यार्थी समूह स्थापन करावा.

अशा नविन विद्यार्थी समूहासाठी प्रथम या पुस्तिकेतील नमुन्याप्रमाणे मार्गदर्शक सूचना तयार कराव्यात आणि त्याची एक प्रत DIET ला माहितीस्तव पाठवावी. यावर DIET ने योग्य ते अभिप्राय शाळेला द्यावेत. सर्व DIET नी असे प्राप्त प्रस्ताव SCERT ला आवश्यक दुरुस्त्यांसह पाठवावेत. याविषयी DIET ने एक अधिव्याख्याता यांची नोडल अधिकारी म्हणून नेमणूक करावी व सर्व शाळांना ती कळवावी.

विद्यार्थी समूहांची प्रत्येक शाळेत सुयोग्य स्थापना, कार्यान्वयन व जिल्ह्यातील विविध स्तरावर सुयोग्य समन्वयन व्हावे यासाठी सर्व क्षेत्रीय अधिकारी/पर्यवेक्षकीय अधिकारी/मुख्याध्यापक/शिक्षक यांनी पुढीलप्रमाणे जबाबदारी देण्यात येत आहे.

विद्यार्थी समूह – मार्गदर्शक सूचना (शाळा/वर्गस्तर)

१) प्रत्येक शाळेत मुख्याध्यापक व शिक्षक यांनी विद्यार्थी समूह स्थापन करून कार्यान्वित करणे आवश्यक राहील. शालेय अभ्यासक्रमाशी सुसंगत असे समुहातील उचित उपक्रम निवडावेत. तसेच उपक्रमांची पुनरावृत्ती टाळावी.

२) समूहासाठीच्या मार्गदरिकित विहित केलेल्या कार्यपद्धतीनुसार प्रत्येक समूहाची अंमलबजावणी करणे अपेक्षित आहे. तथापि शाळांनी याबाबत गरजेनुसार उचित कार्यवाही करावी.

३) समूहांची निवड करताना स्थानिक विविधता, वैशिष्ट्य, उपलब्धता, गरजा, शाळा/ वर्गाची विद्यार्थी संख्या यांचा प्राधान्याने विचार करावा.

४) समूहांमध्ये विद्यार्थ्यांची निवड करताना विद्यार्थ्यांची आवड, कौशल्य, व व्यक्तिमत्त्व विकासाच्या गरजा विचारात घ्याव्यात. तसेच सदर समूह निवडीबाबत त्यांना ताण येणार नाही याची काळजी घ्यावी.

५) समूहाच्या सुयोग्य कार्यान्वयनासाठी आवश्यकतेनुसार मासिक / द्विमासिक/त्रैमासिक / सहामाही/वार्षिक बैठक घेणे बंधनकारक आहे.

६) वर्गातील कोणत्याही विद्यार्थ्याला क्षमतेनुसार एकापेक्षा अधिक समूहात सहभागी करून घेता येईल.

७) समूहाद्वारे आयोजित करावयाचे उपक्रम निवडण्याची लवचिकता मुख्याध्यापकास राहील.

८) शालेय विषयांशी पूरक अशा अधिकाधिक समूहांची शाळा/वर्ग स्तरावर स्थापना करावी.

९) वर्गाचा स्तर, वयोगट व समूहाचे उद्देश विचारात घेऊन शाळा व वर्ग पातळीवर समुहाची स्थापना करावी व समूहाचा मार्गदर्शक/सुलभक म्हणून संबंधित शिक्षकाने जबाबदारी पार पाडावी.

१०) शाळा / वर्ग स्तरावर स्थापन केलेल्या समूहाचे योग्य समन्वयन मुख्याध्यापकांनी करावे.

११) मुख्याध्यापकांनी समूह स्थापना व कार्यान्वयनाचा अहवाल गटशिक्षणाधिकारी यांचेकडे सादर करावा.

१२) सर्व गट शिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुख यांनी विद्यार्थी समूहाचे सतत मार्गदर्शन, पर्यवेक्षण व संनियंत्रण करावे.

१३) प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था आणि शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) यांनी शाळाभेटी दरम्यान विद्यार्थी समूहाचे सुयोग्य संनियंत्रण करावे.

१४) शाळेबाहेरील तज्ञ व्यक्तीही समूहाशी जोडल्या जातील हा प्रयत्न करावा.

१५) कोणत्याही मार्गदर्शक/सुलभक शिक्षकाने

2/3 वर्षांत आपली भूमिका उत्तरोत्तर कमी करून विद्यार्थ्यांना अधिकाधिक कार्यप्रवण करावे.