शालेय परिपाठासाठी प्रार्थना
हेचि अमुची प्रार्थना
हेचि अमुची प्रार्थना अन् हेचि अमुचे मागणे
माणसाने माणसाशी माणसासम वागणे
भोवताली दाटला अंधार दु:खाचा जरी
सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खात्री
तोवरी देई आम्हाला काजव्यांचे जागणे
माणसाने माणसाशी माणसासम वागणे
धर्म, जाती, प्रांत, भाषा, द्वेष सारे संपू दे
एक निष्ठा, एक आशा, एक रंगी रंगू दे
अन पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे
माणसाने माणसाशी माणसासम वागणे
लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले
पाउले चालो पुढे जे थांबले ते संपले
घेतला जो श्वास आता तो पुन्हा ना लाभणे
माणसाने माणसाशी माणसासम वागणे
नमस्कार माझा या ज्ञानमंदिरा
नमस्कार माझा या ज्ञानमंदिरा
सत्यम शिवम सुंदरा
शब्दरूप शक्ति दे, भावरूप भक्ति दे
प्रगतीचे पंख दे चिमणपाखरा
सत्यम शिवम सुंदरा
विद्याधन दे अम्हास, एक छंद एक ध्यास
नाव नेई पैलतीरी दयासागरा
सत्यम शिवम सुंदरा
होऊ आम्ही नीतिवंत, कलागुणी बुद्धिवंत
कीर्ति कळस जाय उंच अंबरा
सत्यम शिवम सुंदरा
खरा तो एकचि धर्म
खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे
जगी जे हीन अतिदीन, जगी जे दीन पददलित
त्यांसी जो आपुले म्हणतो, तोचि तो साधू ओळखावा
देव तेथेचि जाणावा
प्रभूची लेकरे सारी, तयाला सर्वही प्यारी
कुणा ना तुच्छ लेखावे, जगाला प्रेम अर्पावे
असे जे आपणापाशी, असे ते देई इतरांशी
सळाने जो न उरफाटे, जगाला प्रेम अर्पावे
सदा जे आर्त अतिविकल, जयांना गांजती सकल
तया जाऊन हसवावे, जगाला प्रेम अर्पावे
इतनी शक्ती हमें देना दाता (हिंदी)
इतनी शक्ति हमें देना दाता
मन का विश्वास कमजोर हो ना
हम चलें नेक रस्ते पे हमसे
भूलकर भी कोई भूल हो ना
दूर अज्ञान के हो अँधेरे
तू हमें ज्ञान की रौशनी दे
हर बुराई से बचते रहें हम
जितनी भी दे, भली जिन्दगी दे
बैर हो ना किसी का किसी से
भावना मन में बदले की हो ना
हम ना सोचें हमें क्या मिला है
हम ये सोचें किया क्या है अर्पण
फूल खुशियों के बाँटें सभी को
सबका जीवन ही बन जाए मधुबन
अपनी करुणा का जल तू बहा के
कर दे पावन हर एक मन का कोना
शालेय परिपाठ व दिनविशेष यासाठी उपयुक्त अशी माहिती तुम्हाला आमच्या या website मिळेल ततुम्हाला माहिती कशी वाटली हे comment करून नक्की सांगा.

0 Comments