पसायदान
आता विश्वात्मके देवे | येणे वाग्यज्ञे तोषावे
तोषोनि मज द्यावे | पसायदान हे
जे खळांची व्यंकटी सांडो | तया सत्कर्मी रती वाढो
भूता परस्परे जडो | मैत्र जीवांचे
दुरितांचे तिमिर जाओ | विश्व स्वधर्म सूर्य पाहो
जो जे वांछिल तो ते लाहो | प्राणिजात
वर्षत सकळ मंगळी | ईश्वरनिष्ठांची मांदियाळी
अनवरत भूमंडळी | भेटतु भूता
चला कल्पतरूंचे आरव | चेतना चिंतामणींचे गाव
बोलते जे अर्णव | पीयूषाचे
चंद्रमे जे अलांछन | मार्तंड जे तापहीन
ते सर्वाही सदा सज्जन | सोयरे होतु
किंबहुना सर्व सुखी | पूर्ण होऊनि तिन्हीं लोकी
भजिजो आदिपुरुषि | अखंडित
आणि ग्रंथोपजीविये | विशेषी लोकी इये
दृष्टादृष्ट विजये | होआवे जी
येथ म्हणे श्री विश्वेशराओ | हा होईल दान पसावो
येणे वरे ज्ञानदेवो | सुखिया झाला ||
प्रतिज्ञा
भारत माझा देश आहे.
सारे भारतीय माझे बांधव आहेत.
माझ्या देशावर माझे प्रेम आहे.
माझ्या देशातल्या समृद्ध आणि
विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे.
त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता
माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन.
मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा
आणि वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन
आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन.
माझा देश आणि माझे देशबांधव
यांच्याशी निष्ठा राखण्याची
मी प्रतिज्ञा करीत आहे.
त्यांचे कल्याण आणि त्यांची समृद्धी
यातच माझे सौख्य सामावले आहे.
जय हिंद.


0 Comments