विकसित महाराष्ट्र – २०४७ ई-लर्निंग मॉड्यूल (Viksit Maharashtra-2047 E-Learning Module) - शालेय शिक्षण विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना ३० नोव्हेंबर २०२६ पूर्वी कोर्स पूर्ण करणे बंधनकारक!
![]() |
शिक्षण आयुक्त सचिन्द्र प्रताप सिंह (भा.प्र.से.) यांच्या स्वाक्षरीने दि. २९ ऑक्टोबर २०२६ रोजी हे अधिकृत परिपत्रक निर्गमित करण्यात आले असून, सर्व संबंधित कार्यालयांना याबाबत तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.
परिपत्रकाचा थोडक्यात आढावा (Key Highlights)
परिपत्रकातील सविस्तर माहिती व शासनाचे निर्देश
हा नियोजन विभागाचा उपक्रम असून नियोजन विभागामार्फत कर्मयोगी भारत (iGOT Karmayogi) या डिजिटल प्लॅटफॉर्मवर 'विकसित महाराष्ट्र ई-लर्निंग मॉड्यूल' (Viksit Maharashtra-2047 E-Learning Module) हा महत्त्वपूर्ण प्रशिक्षण कोर्स सुरू करण्यात आला आहे. हा कोर्स पूर्ण करणे बंधनकारक असून शालेय शिक्षण व क्रीडा विभागातील आणि त्याअंतर्गत येणाऱ्या सर्व कार्यालयांमधील संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी हा ऑनलाइन कोर्स दि. ३० नोव्हेंबर, २०२६ पूर्वी पूर्ण करणे बंधनकारक आहे. शिक्षण विभागाने आढावा व तातडीचे निर्देश : विभागातील तसेच अधिनस्त कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपल्या स्तरावर याविषयी तात्काळ आढावा घ्यावा आणि आपल्या अधिपत्याखालील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना हा कोर्स विहित मुदतीत पूर्ण करण्याचे तातडीने निर्देश द्यावेत, असे स्पष्ट आदेश शिक्षण आयुक्तांनी दिले आहेत.
संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (SCERT), महाराष्ट्र, पुणे
अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे
अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे (राज्य)
शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे
शिक्षण संचालक (प्राथमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे
संचालक, शिक्षण संचालनालय (योजना), महाराष्ट्र राज्य, पुणे
संचालक, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ (बालभारती), पुणे
तसेच आवश्यक कार्यवाहीसाठी सर्व iGOT एमडीओ लीडर (iGOT MDO Leaders) आणि सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक यांनाही या पत्राची प्रत पाठवण्यात आली आहे.
कोर्स पूर्ण करण्यासाठी अधिकृत लिंक (Direct Course Link)
संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी iGOT Karmayogi पोर्टलवर जाऊन खालील थेट लिंकद्वारे “विकसित महाराष्ट्र – २०४७ ई-लर्निंग मॉड्यूल” हा कोर्स निवडून ३० नोव्हेंबर २०२६ पूर्वी पूर्ण करावा
कोर्सची अधिकृत लिंक: Viksit Maharashtra-2047 E-Learning Module (iGOT Karmayogi)

