महाराष्ट्र शिष्यवृत्ती परीक्षा २०२६ प्रश्नपत्रिका PDF डाउनलोड करा | Scholarship Question Paper 2026
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दरवर्षी पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा (MSCE Pune Scholarship Paper) आयोजित केली जाते. या परीक्षेमध्ये चांगले गुण मिळवण्यासाठी अभ्यासासोबत मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका सोडवणेही तितकेच महत्त्वाचे आहे.
पण शैक्षणिक वर्ष २०२६ पासून हि परीक्षा इयत्ता ४ थी व ७ वी साठी शिष्यवृत्ती परीक्षा सुरु करण्यात आली आहे. 2026 मध्ये झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या प्रश्नपत्रिका आता विद्यार्थ्यांना PDF स्वरूपात सरावासाठी उपयोगी पडू शकतात. त्यामुळे या लेखामध्ये आपण इयत्ता ४ थी, ५ वी, ७ वी आणि ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा 2026 प्रश्नपत्रिका, पेपर क्रमांक 1, पेपर क्रमांक 2, प्रश्नपत्रिकेचे संच आणि उत्तरसूची (4th scholarship question papers with answers pdf marathi medium) याबद्दल माहिती पाहणार आहोत.
शिष्यवृत्ती परीक्षा 2026 महत्त्वाची माहिती
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यामार्फत 22 फेब्रुवारी 2026 रोजी पूर्व उच्च प्राथमिक आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली होती.
| तपशील | माहिती |
|---|---|
| परीक्षेचे नाव | महाराष्ट्र शिष्यवृत्ती परीक्षा 2026 |
| परीक्षा मंडळ | महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे |
| परीक्षा दिनांक | 22 फेब्रुवारी 2026 |
| इयत्ता | 4थी, 5वी, 7वी आणि 8वी |
| 4थी परीक्षा | पूर्व उच्च प्राथमिक (PUP) |
| 5वी परीक्षा | पूर्व उच्च प्राथमिक (PUP) |
| 7वी परीक्षा | पूर्व माध्यमिक (PSS) |
| 8वी परीक्षा | पूर्व माध्यमिक (PSS) |
| परीक्षा पद्धत | ऑफलाइन (OMR) |
| प्रश्नपत्रिका | पेपर 1 आणि पेपर 2 |
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत (MSCE Pune) घेण्यात येणाऱ्या इयत्ता ४ थी (पूर्व उच्च प्राथमिक) आणि ७ वी (पूर्व माध्यमिक) शिष्यवृत्ती परीक्षा २०२६ (Maharashtra scholarship exam 2026 registration) साठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. जे विद्यार्थी या परीक्षेसाठी पात्र आहेत, त्यांनी शेवटच्या तारखेची वाट न पाहता लवकरात लवकर आपला अर्ज (Online Form) भरून घ्यावा. शिष्यवृत्ती परीक्षेचा ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी आणि अधिकृत माहितीपत्रक पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
इयत्ता ७ वी शिष्यवृत्ती परीक्षा २०२६ ऑनलाईन फॉर्म | 7th scholarship exam 2026 apply online link
शिष्यवृत्ती परीक्षा 2026 प्रश्नपत्रिका PDF डाउनलोड (Scholarship Question Paper 2026)
इयत्ता चौथी, पाचवी, सातवी,आणि आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षेचे दोन पेपर असतात. पहिल्या पेपरमध्ये मराठी व गणित, तर दुसऱ्या पेपरमध्ये भाषा आणि बुद्धिमत्ता चाचणीचा समावेश असतो.
खाली दिलेल्या लिंकवरून उपलब्ध प्रश्नपत्रिका संच A PDF स्वरूपात पाहता किंवा डाउनलोड करता येतील.8th Scholarship Question Paper 2026 PDF, 5th Scholarship Question Paper 2026 PDF, 8th Scholarship Question Paper 2026 PDF
| इयत्ता | पेपर क्र. १ | पेपर क्र. २ |
|---|---|---|
| इयत्ता ४ थी | DOWNLOAD PDF | DOWNLOAD PDF |
| इयत्ता ५ वी | DOWNLOAD PDF | DOWNLOAD PDF |
| इयत्ता ७ वी | DOWNLOAD PDF | DOWNLOAD PDF |
| इयत्ता ८ वी | DOWNLOAD PDF | DOWNLOAD PDF |
शिष्यवृत्ती परीक्षा ही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी एक महत्त्वाची संधी आहे. योग्य अभ्यास, नियमित सराव आणि मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण केल्यास परीक्षेची तयारी अधिक चांगल्या प्रकारे करता येते.
या लेखातील 5वी व 8वी शिष्यवृत्ती परीक्षा 2026 प्रश्नपत्रिका PDF आणि उत्तरसूची आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून ठेवा. तसेच आपल्या मित्रांना, शिक्षकांना आणि पालकांनाही ही माहिती नक्की शेअर करा.


