बोनाफाईड सर्टिफिकेट (Bonafide Certificate) PDF डाउनलोड: अर्ज नमुना आणि उपयोग

 

बोनाफाईड सर्टिफिकेट (Bonafide Certificate) PDF डाउनलोड - अर्ज नमुना आणि उपयोग


विद्यार्थ्यांना शैक्षणिक काळात अनेक महत्त्वाच्या कागदपत्रांची आवश्यकता असते, त्यापैकीच एक अत्यंत महत्त्वाचे कागदपत्र म्हणजे 'बोनाफाईड सर्टिफिकेट' (Bonafide Certificate). शिष्यवृत्तीचा अर्ज भरण्यापासून ते बँकेत नवीन खाते उघडण्यापर्यंत अनेक ठिकाणी याची गरज भासते.

आजच्या या लेखामध्ये आपण बोनाफाईड सर्टिफिकेट म्हणजे काय, त्याचे प्रमुख उपयोग कोणते, बोनाफाईड सर्टिफिकेट मिळवण्यासाठी शाळेत किंवा महाविद्यालयात अर्ज कसा करावा आणि Bonafide Certificate PDF Download कसे करावे, याविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत.

bonafide certificate pdf download maharashtra

बोनाफाईड सर्टिफिकेट म्हणजे काय? (What is Bonafide Certificate?)

'बोनाफाईड सर्टिफिकेट' म्हणजे संबंधित विद्यार्थी त्याच शाळेत किंवा महाविद्यालयात सध्या शिकत असल्याचा अधिकृत पुरावा होय. हे प्रमाणपत्र शाळेचे मुख्याध्यापक किंवा महाविद्यालयाचे प्राचार्य यांच्या सही-शिक्क्याने दिले जाते. यामध्ये विद्यार्थ्याचे नाव, जन्मदिनांक, इयत्ता, हजेरी क्रमांक (Roll No.) आणि शैक्षणिक वर्ष यांसारखी महत्त्वाची माहिती नमूद केलेली असते.

बोनाफाईड सर्टिफिकेटचे महत्त्वाचे उपयोग (Uses of Bonafide Certificate)

बोनाफाईड प्रमाणपत्राचा उपयोग विविध शासकीय आणि खाजगी कामांसाठी केला जातो: १. शिष्यवृत्ती (Scholarship) - महाडीबीटी (MahaDBT) आणि इतर शासकीय शिष्यवृत्तीचे फॉर्म भरण्यासाठी. २. बँक खाते (Bank Account) - विद्यार्थ्याचे स्वतःचे बँक खाते उघडण्यासाठी रहिवासी किंवा ओळखीचा पुरावा म्हणून. ३. प्रवास सवलत (Travel Concession) -  एसटी बस किंवा रेल्वे पास (Student Pass) काढण्यासाठी.४. पासपोर्ट (Passport) - पासपोर्ट काढताना विद्यार्थी असल्याचा पुरावा देण्यासाठी. ५. वसतिगृह प्रवेश (Hostel Admission) -  शासकीय किंवा खाजगी हॉस्टेलमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी.

PAT 2 संकलित मूल्यमापन 2 गुणनोंद तक्ते 2026-27 (PDF & Excel Sheet Download) - Click Here


बोनाफाईड सर्टिफिकेट मिळवण्यासाठी अर्ज कसा लिहावा? (Application Format in Marathi)

बोनाफाईड सर्टिफिकेट मिळवण्यासाठी तुम्हाला शाळेच्या मुख्याध्यापकांना किंवा महाविद्यालयाच्या प्राचार्यांना एक लेखी अर्ज द्यावा लागतो. तो अर्ज खालीलप्रमाणे लिहावा

bonafide certificate format marathi

Download PDF :  DOWNLOAD PDF
Download Word File : DOWNLOAD Docx

Bonafide Certificate PDF Download (कोरा नमुना)

शाळा आणि महाविद्यालयांना विद्यार्थ्यांसाठी बोनाफाईड सर्टिफिकेट तयार करण्यासाठी किंवा विद्यार्थ्यांना स्वतः प्रिंट काढून शाळेत नेण्यासाठी बोनाफाईड प्रमाणपत्राचा कोरा नमुना (Blank Format) खालील लिंकवरून PDF स्वरूपात डाउनलोड करता येईल.

Bonafide Certificate मराठी मध्ये डाऊनलोड करण्यासाठी पुढे दिलेल्या DOWNLOAD NOW बटनावर क्लिक करा.

DOWNLOAD NOW